मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसीच्या (भाजीपाला बाजार) मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. प्रवेशद्वाराबाहेरच पाणी साचल्यामुळे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेकांना गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून चालावं लागत आहे. मेफ्को मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचलं आहे.