इगतपुरी नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. जागोजागी पाण्याचे पाइप फुटले असून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. फुटलेल्या पाइपमधून दुषित आणि गढूण पाणी घराघरात पोहोचतंय. नगर परिषदेला याबद्दलची माहिती दिल्यावर अर्धा तास गढूळ पाणी वाया जाऊ द्या, मग पाणी भरा असं उत्तर देण्यात आलं.