मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी नगर आणि नाशिक जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जायकवाडी धरणातील नाथसागरात जलपूजन करण्यात आले.