पालघरमधल्या डहाणू तालुक्यातील साखरे धरणाच्या कुशीत वसलेल्या साखरे गावावर पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. एकीकडे साखरे धरणातून तालुक्यातील विविध भागांना पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे धरणालगतच्या साखरे गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असल्याने ग्रामस्थांचा संताप होत आहे.