जळगाव जिल्ह्यातील 33 गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत असून जिल्हा प्रशासनातर्फे 20 गावांसाठी 30 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाईमुळे टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. उपाययोजनांच्या माध्यमातून 33 हजारांवर ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे.