अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पाणीटंचाईचा फटका आता सलून व्यावसायिकांनाही बसू लागलाय. पाणी उपलब्ध होत नसल्याने हेअर वॉश, हेअर स्पा, फेशियलसह अनेक सेवांवर मर्यादा येत आहेत. पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याने खर्चातही वाढ होतेय. त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना सलून व्यावसायिकांची कसरत सुरू आहे.