कास धरण पूर्ण भरलेले असतानाही सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून 'रास्ता रोको' आंदोलन केले. पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रहिवाशांनी पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी केली.