अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली असून त्यासोबतच पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मान्सून लांबणीवर पडल्यास अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गावोगावी पाणीपुरवठ्यासाठी साठवण तलावांमध्ये पाणी साठवले जात असले, तरी अनेक ठिकाणी हे तलाव आता तळाला लागले आहेत.