कराडमधील कडरा गावात सध्या भीषण पाणी टंचाईची समस्या भासत आहे. गेल्या चार दिवसांपासून गावात पाणीच आलेलं नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविणा हाल होत आहेत. याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीसमोर नागरिकांचा हंडा मोर्चा काढला. दरम्यान आमदार डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने गावात पाण्याचे टँकर पाठवून गावकऱ्यांची गैरसोय दुर केल्याने ग्रामस्थांनी आभार मानलेत.