दीर्घकाळ मृतसाठ्यात असलेला खडकपूर्णा प्रकल्प हलक्या पावसामुळे जेमतेम जिवंत साठा झाला आहे. मात्र सिंचनासह भविष्यातील पाणी प्रश्न अद्याप अंधारातच आहे. आज रोजी धरणात अवघा २.४८ टक्के जिवंत जलसाठा आहे. त्यामुळे पाणीपातळी कालव्याच्या उंबरठ्याखाली असल्याने सध्या कालव्याद्वारे पाणी सोडणे शक्य नाही.. सप्टेंबर अखेरपर्यंत मुख्य पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यास खली, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यांतील रब्बी सिंचन संकटात सापडण्याची चिन्हे आहेत..