मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर, मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये गाळ साचला. नदीच्या तीव्र प्रवाहात केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा ४८ तासांपासून ठप्प. कल्याण-डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा फटका.बेतुरकर पाड्यात महिला बादल्या, टब आणि ड्रममध्ये पावसाचे पाणी साठवून गरज भागवत आहेत.