अंबरनाथच्या पश्चिम भागात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त नागरिकांसह भाजप नगरसेवक उमेश पाटील आणि किरण राठोड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून, पाणी येत नसल्याने आम्ही पाण्याचे बिलही भरणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.