जळगाव जिल्ह्यात जुलै महिना निम्मा उलटला तरी 38 टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यात भुसावळ, जामनेर, पारोळा, एरंडोल व अमळनेरमध्ये या तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई कायम आहे. जिल्ह्यात सध्या 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून जामनेर तालुक्यात सर्वाधिक 25 टँकर कार्यरत आहेत.