यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. कंडारी (ता. भुसावळ) या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने पहिला टँकर सुरू केला असल्याची माहिती याचवेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली.