पुण्याच्या भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातून पूर्वेकडील भागात गेलेल्या धोम बलकवडी डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या पाणी मागणीनुसार शासनाने कालव्याला तिसरे उन्हाळी आवर्तन ३०० क्युसेकने १२ दिवसांसाठी सोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी मिळणार आहे.