वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीवर उभारलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला अद्यापही गेट न बसवल्यामुळे नदीचे पाणी थेट वाहून जात आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याआधीच मानोरा शहरावर पाणीटंचाईचे संकट येण्याची भीती आहे.