पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य जव्हारला 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. पावसाळा सुरू होताच येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागतात. त्यात सर्वाधिक प्रसिद्ध असलेला जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा सध्या पर्यटकांनी गजबजून गेला आहे. विशेष म्हणजे पर्यटन विकासाच्या माध्यमातून शासनाने येथे आकर्षक काचेचा व्ह्यूइंग ब्रिज उभारला असून त्यावरून धबधब्याचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.