धाराशिवच्या लोहारात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे कलिंगडची शेती जमीनदोस्त झाली असून लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. काढणीला आलेल्या कलिंगडच्या पिकाला गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.