यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वनवारला चे टरबूज उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे, टरबूजाला कवडीमोल भाव मिळत असल्याने , हताश शेतकऱ्यांवर लाखो रुपयांची गुंतवणूक केलेले टरबूज गुरांना खाऊ घालण्याची किंवा शेतात सोडून देण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती सर्व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. टरबूजाला बाजारात तीन ते चार रुपये एवढा अल्पभाव मिळत आहे. त्यामुळे टरबूज गुरांना टाकावे लागत आहेत