उन्हाची तीव्रता वाढली असल्याने या पासून दिलासा मिळावा म्हणून लिंबू सरबतचा आधार घेतला जातो. मात्र गेली वर्षभर अनुकूल वातावरण नसल्याने लिंबू उत्पादनाला मोठा फटका बसला असून, उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ५०० हेक्टरवरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.