धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या सांगवी येथील प्लांट इथे प्रशासनाच्या वतीने मॉकड्रिल घेण्यात आली. शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियमच्या प्लांट परिसरात एक बेवारस पिशवी आढळून आल्याची माहिती पथकाला मिळाली.