उतारवयात सेवानिवृत्तीनंतर पैसा गाठीशी असणे गरजेचे आहे. आजारपण, औषधपाणी आणि इतर खर्चासाठी पैसा असणे गरजेचे आहे. मुलांवर तुमचे ओझे टाकायचे नसेल तर तुम्ही वेळेत काही योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. यामुळे रिटायरमेंटनंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे मिळतील.