चिपळूणमधील वाशिष्टी नदीतील स्वच्छ पाणी अचानक पांढरं होत असल्याचं दिसून येत आहे. वाशिष्ठी नदी पात्रात केमिकलसदृश्य रसायनं सोडल्याचा प्रकार समोर आला असून नदीतील स्वच्छ पाण्याचा रंग पांढरा झाला आहे. पांढऱ्या रंगाचे तवंग नदीच्या पाण्यावर दिसत आहेत. वाशिष्ठी नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.