उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात अशी घोषणा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंना आता केम छो शिंदे असे म्हणायचं का अशी टीका केली होती. त्यास आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर देत आदित्य ठाकरे यांनी वरळीत केम छो वरळी हे बॅनर लावले तेव्हा आव्हाड कुठे होते असा सवाल केला आहे.