धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. कळंब, वाशी आणि धाराशिव परिसरात पाऊस झाला, तर इतर तालुक्यांतही हलक्या पावसाची नोंद झाली. मात्र, हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप खोळंबलेल्या आहेत.