गेल्या काही दिवसांपासून परिसरात रानटी प्राण्यांचा वावर वाढला असून, आता चिचोली येथील शेतशिवारात एका महाकाय रानगव्याने अक्षरशः हैदोस घातल्याची घटना समोर आली आहे. अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळलेल्या या रानगव्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्याला पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी या घटनेचे चित्रीकरण केले असून, गव्याच्या मुक्त संचाराचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवसाढवळ्या रानगवा शेतात फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.