अकोला जिल्हातील अकोट तालुक्यातल्या अकोली जहागीर इथं केळी उत्पादक शेतकरी प्रशांत माकोडे यांच्या चार एकर केळी पिकावर रानडुकरांनी हल्ला करून मोठं नुकसान केलं आहे. सुमारे सव्वाशे ते दीड एकर क्षेत्रातील तब्बल 2 हजारांहून अधिक केळीची झाडे उध्वस्त केली असून शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.