महाबळेश्वरपासून किल्ले प्रतापगडकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर भर दिवसा महाकाय रानगवा नागरिकांच्या निदर्शनास आला. या रानगव्याचा मुक्त वावर काही स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा रानगवा एका हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोर थांबला त्यानंतर थेट रस्ता ओलांडून जंगलामध्ये निघून गेला.