गडचिरोली छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर मुक्काम ठोकून रानटी हत्तींच्या कळपाने दहशत निर्माण केली आहे. चार दिवसांपासून गडचिरोली लगतच्या जंगल परिसरात रानटी हत्तीने धुमाकूळ घातलेला आहे. चार दिवसाआधी एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार मारल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आज काही ठिकाणी शेतीचं आणि घरांचं नुकसान केल्याचं प्रकरण समोर आलं.