जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील जैवविविधतेने समृद्ध गौताळा अभयारण्यात वन्यप्राणी गणना पार पडणार असून दरवर्षी बौद्ध पौर्णिमेनिमित्त ही प्रक्रिया राबवली जाते. सायंकाळी चार वाजल्यापासून गणनेला सुरुवात होणार असून पाटणादेवी परिसरात चार ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तसेच मचान उभारण्यात आले आहेत.