मुक्ताईनगर तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नायगाव येथील अंगणवाडीचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे इमारतीचे टीन पत्रे उडून गेले, तर जुन्या असलेल्या भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत अंगणवाडीतील मुलांच्या खेळण्यांचे नुकसान झाले.