डोंबिवलीतल्या एमआयडीसी निवासी भागात वाहन शिकताना एकाचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट गटारात घुसली. सुदैवाने युवती आणि प्रशिक्षक देणारा चालक या अपघातातून थोडक्यात बचावले. तर गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघातात महावितरणच्या स्टे केबलचं आणि संरक्षक भिंतीचं नुकसान झालं.