खेडमध्ये पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने एक महिला तिच्या दुचाकीसह पाण्यात अडकली होती. सरफराज पांगारकर, एजाज खेडेकर, खलील जुईकर आणि अल सफा वेल्फेअर फाऊंडेशनचे कार्यकर्ते तात्काळ मदतीसाठी धावले. आणि त्यांनी या महिलेला सुरक्षितरित्या पाण्यातून बाहेर काढले.