अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात सराफाच्या दुकानातून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी भरलेल्या आठवडे बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेने ही चोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात आली होती.