नागपूर शहरातील एका प्रतिष्ठित ज्वेलर्सच्या शोरूम मधून ग्राहक बनून आलेल्या एका महिलेने सोन्याची अंगठी चोरली... चोरीची ही घटना शोरूम मधील सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली... मात्र पोलिसांकडे तक्रार दाखल होण्यापूर्वीच संबंधित महिलेने संध्याकाळी परत येऊन शोरूमच्या गार्डवर अंगठी फेकली आणि पळून गेली...