जळगाव मधील रावेर येथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... नावाचा जयघोष करत आज रावेर येथे 186 वर्षाची परंपरा असलेल्या श्री दत्त जयंती निमित्त रथोत्सवाला सुरुवात झाली आहे. 186 वर्ष जुन्या परंपरा असलेल्या दत्त महाराजांच्या रथोत्सव ओढण्याचा मान महिलांना देण्यात आलाय. दत्त मंदिराचे गादीपती ऋषिकेश महाराज जनार्दन हरी जी महाराज यांच्या साधुसंत महंत यांच्या हस्ते व महाआरती करण्यात आली.