नव्या ‘लाइफस्टाईल’मध्ये मैत्री दिन धडाक्यात साजरा होत असतानाच, या आणि अशा उत्सवाची पुसटशीही कल्पना नसलेल्या आणि रोज १०-१२ तास डोंगरदऱ्यांत, रानावनात, ऐन पावसात भात लावणी करणाऱ्या, शेतीत राबराब राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी आज रविवारी आयुष्यातील पहिलावहिला मैत्री दिन अनुभवला आहे.