जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे गोरगरीबांना रेशन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही तांत्रिक अडचणींच्या कारणामुळे रेशन मिळत नसल्याने वरणगाव येथे कॅम्प आयोजित करण्यात येणार होता.