परळी ते बीड रोड वरील पांगरी तांडा व पांगरी कॅम्प येथे दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार घेतला असून स्वत: दारूचे अवैध अड्डे उध्वस्त केले आहेत. स्वत: दारू पकडून देण्याचे पाऊल आता महिलांनी उचलले आहे. यासाठी परळी ग्रामीण पोलिस व पांगरी गावचे पोलिस पाटील यांच्या मदतीने कारवाई केली. दारूमुळे संसारात कलह निर्माण होत आहेत तसेच दारूड्यांमुळे किरकोळ भांडणेही होतात.