भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील पारडी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या ऐतिहासिक स्पर्धेत गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत क्रीडांगण गाजवले. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाडूवृत्ती, संघभावना आणि आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन घडवले.