इगतपुरीमधील धरणांच्या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागतेय. खंबाळे ग्रामपंचायत अंतर्गत शिदवाडी इथं भीषण पाणीटंचाई जाणवतेय. हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागतेय. गढूळ आणि दूषित पाणी पिण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे.