परळी मधील वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या जागेवर गेली पन्नास वर्षापासून असलेले अतिक्रमण आता न्यायालयाच्या आदेशानंतर काढले जात आहे.परळी मधील चांदापूर रोडवर 10 एक्कर 21 गुंठे इतकी जमीन आहे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टची जमीन आहे.ही जमीन वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना वहिती करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली होती.मात्र याच जमिनीवर भूमाफियांकडून अतिक्रमण करण्यात आलेले होते. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या पुजाऱ्यांकडून अनेक वेळा उपोषण करण्यात आले होते.तसेच यासंदर्भातली न्यायालयीन लढाई देखील सुरू होती आता न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या मोठ्या बंदोबस्तात सदरील अतिक्रमण हे मंगळवार दुपारपासूनच हरवले जात असून या जागेवरील अतिक्रमण काढून या जमिनीचा ताबा तात्काळ वैद्यनाथ देवस्थान व पुजाऱ्यांना दिला जाणार आहे.