कोकणात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होतो. यंदा लवकर 27 ऑगस्टलाच गणेश चतुर्थी सन आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणपती शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तींना आकार देण्याचे काम सध्या दिवस रात्र सुरू आहे. बाजारामध्ये मातीने बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींना मागणी आहे त्यामुळे इको फ्रेंडली मूर्ती बनवण्याकडे गणपती शाळांचा कल असल्याचे दिसून येत आहे. शाडू मातीच्या मुर्तीला कोकणात मोठी मागणी आहे. त्यामुळे याठीकाणी मूर्तीकार रात्रंदिवस मुर्ती घडवण्याच्या कामात व्यस्त झाला आहे.