वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्यावर डोंबिवलीकरांनी देशभक्तीचा अभूतपूर्व आविष्कार सादर केला आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून अडीच लाख मातीच्या रंगीत पणत्यांपासून साकारण्यात आलेली भारतमातेची भव्य मोझॅक प्रतिमा सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. या अनोख्या उपक्रमातून डोंबिवलीत दिव्यांचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला असून डोंबिवलीकरांचा आवडता ‘उत्सव’ आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.