इराण-अमेरिका- इजरायल युद्ध थांबावं यासाठी चंद्रपुरात विश्वविक्रमी मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. चंद्रपूर येथील सोमय्या ग्रुप ही विश्वविक्रमी मानवी साखळी तयार करणार आहे. "वर्ल्ड पीस सिम्बॉल" मानवी साखळी द्वारे तयार करून नवीन गिनीज विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. 2019 साली 1074 विद्यार्थ्यांनी वर्ल्ड पीस सिम्बॉल मानवी साखळी द्वारे तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली होती. चंद्रपुरात आज हा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी तब्बल 2000 विद्यार्थी सज्ज झाले आहेत.