ढगाळ वातावरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील हरभरा पीक धोक्यात आले आहे . यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे . शेतकऱ्यांनी पेरलेला हरभरा पीक सध्या फूल अवस्थेत असून, फुल गळ होत आहे, तर काही ठिकाणी घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे, त्यावर किडींचा आणि अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे .