सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही रस्त्यांची सुविधा अपुरी असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मोलगीपासून मनीबेलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.