अहिल्यानगरमधील नगर- मनमाड महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. सध्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना या खड्ड्यांतून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या महामार्गाचं काम रखडलं असून तीन वेळा टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे.