परळी तालुक्यातील सेलू ते बोधरगाव जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत .