अहिल्यानगरमध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित रॅलीत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रेसलर द ग्रेट खली यांनी हजेरी लावली. नगर शहरातून भव्य रोड शो काढण्यात आला असून या रोड शोमध्ये खली यांच्यासह भाजपाचे माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते. खली यांच्या उपस्थितीमुळे प्रचार रॅलीकडे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.